आपली गरज





                  निसर्ग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक सुंदर भागआपल्या सगळ्यांसाठी एकच ना गरिब ना श्रीमंत प्रत्येकाला सारखा असा,त्यात करून आम्ही मोठे भाग्यशाली पश्चिम घाटाच्या छत्रछायेत आम्ही राहतोय.आपल्या सह्याद्रिच जेवढ वण॔न कराव तेवढ
कमीच आहे; लाखो प्राण्यांचे,पक्ष्यांचे ,झाडांचे माहेरघरच जणू!!
आणि ह्या सह्याद्रिच्या कुशीतली आपण कोकणी माणसं, आज 
 अख्या जगाला घरात बसवणारी कोरोना सारखी महामारी आमच्या
 कोकणात आलीय त्याच कारण आपलेच नातेवाईक आज आपल्या 
घरी धावलेत आणि आपल्याकडील स्थिती आता भयावह झालीय,
पण ह्या अश्या परिस्थितीतही आम्ही सगळे "अतिथी देवो भवः"
हेच म्हणून सेवा देतोय. 
ह्या महामारीच्या काळात सगळ्यांचच नुकसान झालंय, कोणाच्या
नोकर्या गेल्यात , तर कोणाची घर उध्वस्त झालीत ;घर कस चालवायचे??हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय..
तसेच सरकारला ही अर्थव्यवस्था कशी सुरळीत करावी?हा प्रश्न 
पडलाय आणि त्यासाठीच अस म्हणा ना !आपल्या पश्चिम घाटातील
388 गाव तर आपल्या सिंधुदुर्गातील 15 गाव  पर्यावरण संवेदनशील 
(इको सेन्सिसीटीव्ह) भागातून वगळण्याची मागणी  आणि त्या भागात 
मायनिंग,मोठ्या कंपन्यांना, मोठे प्रकल्प चालू करण्यासाठी महाराष्ट्र
सरकारने केंद्राकडे मागणी केली होती. पण परवा केंद्र सरकारने ती अमान्य केलीय आणि पर्यावरण प्रेमी,पर्यावरण अभ्यासकांच्या 
मेहनतीला यश आले.
आता प्रश्न आहे तो ज्या भागात आधीपासूनच मायनिंग चालू भागाचा!!
कित्येक  वर्षांपासून सगळ्यांचेच लक्ष आपल्याकडच्या डोंगर, मातीकडे 
आहे; जमीनीवर हक्क अधिक बळकवायला निघालोत सगळे. 
आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्या सगळ्यांपुढे हा
एकच मार्ग आहे का?? मायनिंग, मोठ्या कंपन्यान मधूनच आपण 
पैसे मिळवू शकतो का?? 
गेल्या 5 वर्षात आपल्याकडील नुसते वनक्षेत्र कमी झाले नाही तर
2015सालातील घनदाट जंगलाच क्षेत्र 85,904 sq.km वरून
फक्त  9,978sq. Km एवढच शिल्लक राहिलेय.एवढी वृक्षतोड झालीय म्हणून हत्तींनी तेरेखोल,तिलारी,माणगाव खोरे ह्या भागात तळ ठोकलाय,आता जर अजून वृक्षतोड झाली तर हत्ती संपूर्ण सिंधुदुर्ग भ्रमंती करायला वेळ  नाही लागणार. 
आपल्याला औद्योगिकीकरण हवय की विकास हवाय?
औद्योगिकीकरण झाल म्हणजे आपला विकास झाला??
आज आपण सगळ्यांनीच एकमेकांना साथ देवून, प्रत्येकाच्या  कलेला 
न्याय देवून बेरोजगारी हटवणे गरजेचे आहे.आपल्या सिंधुदुर्गात कित्येक ओस पडलेली घर आहेत आपण त्यांचा वापर करून छोटे छोटे उद्योग करू शकत नाही?आपल्याकडे लागवड होत असलेली पीक,फळ ...ह्यातून आपण रोजगार  निर्मीती नाही करू शकत?
कंपन्या झाल्या तर  आपल्याला रोजगार मिळेल ह्यात शंकाच नाही पण त्याबदल्यात आपण आपला श्वास गमावणार . 
निसर्गाला हानी न करता पण आपण खूप छान जगू शकतो फक्त प्रत्येकाने पैसे न बघता आपल्या सुंदर डोळ्यांनी निसर्ग बघा हवा.प्रत्येकाच्या ज्ञानाला ,कलेला,मेहनतीला
आपुलकीने सन्मान आणि न्याय मिळवून देण्यासाठी आज जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे.ज्या कोकण भूमीचा आपल्या सर्वांना अभिमान आहे , त्याला जपण्याची पण जबाबदारी आपलीच आहे.
आपल्या ज्ञानाचा,कलेचा वापर करून आपल्या  गरजा पुर्ण करुया आणि आपला कोकणातील सौंदर्याला वाचवू या.




Comments

Post a Comment